नागपूर : पालिका आयुक्त म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी पहिलाच जोरदार दणका दिला आहे. ज्या गुंडाची नागपुरात दहशत होती. त्याच्याच अनधिकृत बंगल्यावर हातोडा मारण्यात आला आहे. नागपुरातील गुंड आणि गँगस्टर संतोष आंबेकर याच्या इतवारी परिसरातील अनधिकृत बंगला पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मनपा अतिक्रमण विभागानेही कारवाई केली आहे. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुंड संतोष आंबेकरची अनेक काळी कृत्ये याच बंगल्यात झालेली आहेत. आंबेकरचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न तुकाराम मुंढे करत असतानाच ही सर्वात मोठी कारवाई म्हटली जात आहे. गँगस्टर संतोष आंबेकरचा आलिशान असणारा अनधिकृत बंगला पाडण्यास आज दुपारी सुरुवात झाली. मनपाच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. दोन जेसीबी आणि एका पोकलँडच्या मदतीने या गँगस्टरचा बंगला पाडण्यास सुरूवात केली. संतोषने गेल्या अनेक वर्षे गँग चालवून कोट्यवधींची संपत्ती गोळा केली. त्याने याच बंगल्यात अनेक काळे कारनामे केले होते. अनेकांना मारहाण, खंडणीसाठी टॉर्चर, अनेक तरुणींवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. याबाबत त्याच्यावर गुन्हे दाखलही आहे. मात्र, त्याच्या अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात आलेली नव्हती. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्विकारल्यानंतर ही कारवाई सुरु झाली.



ऑक्टोबर महिन्यापासून पोलिसांनी संतोष आंबेकर विरोधात कारवाई करत १२ ऑक्टोबरला त्याला अटक केली होती. त्यानंतरत्याच्या विरोधात आतापर्यंत मारहाण, खंडणी, बलात्कार, लुबाडणूक असे वेगवेगळे १८ पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी संतोष आंबेकर विरोधात मकोका अंतर्गत ही कारवाई करत त्याचे साम्राज्याचा उद्ध्वस्त करणे सुरू केले होते. तेव्हापासून त्याचा अनधिकृत बांधकाम पाडला जाईल, अशी माहिती होती. मात्र, महापालिकेत त्यासंदर्भातला पावले उचलली नव्हती. अखेर कारवाई आज करण्यात आली आहे.


दरम्यान, नागपूर क्राईम ब्रॅंच विभागाने ही कारवाई पालिका आयुक्तांच्या अंतर्गत असल्याचे सांगून हात झटकले होते. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर गुंड आंबेकर याचा अनधिकृत बंगला पडण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेत. आज महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. इतवारी परिसरात संतोष आंबेकर याचा प्रशस्त आणि जयपुरी गुलाबी दगडाने सजवलेला बंगला कोट्यवधी रुपयांचा आहे.